भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही. ठाकरे आणि राणेंकडून वारंवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. गेल्या काही दिवसांआधीच लोकसभेचा निकाल लागला.नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला.लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. (Nitesh Rane)
(हेही वाचा –एसी लोकल आणि फर्स्ट क्लासच्या डब्यात घुसखोरीला आळा, मध्य रेल्वेचे ‘Special task force’करणार…)
याचदरम्यान मुंबईतील मातोश्रीबाहेर भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) समर्थकांचे बॅनर लावण्यात आले आहेत. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे कलानगर येथे हे बॅनर झळकवण्यात आले आहेत. नितेश राणे यांचे समर्थक मयूर बगेरिया यांनी हे बॅनर लावले आहेत. 23 जून रोजी नितेश राणे यांचा वाढदिवस असल्याने राणे समर्थकांनी बॅनर लावल्याचे दिसून येत आहे. (Nitesh Rane)
(हेही वाचा –ऑफिसमध्ये सरकारी कर्मचारी उशिरा येतात? Central Govtने घेतला महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या…)
नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बॅनर लावण्यात आले आहे. दरम्यान बॅनरवर हिंदू धर्म रक्षक असा त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Nitesh Rane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community