भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane Controversial Statement) हे नेहमीच आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात. अशातच आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, यापुढं कोणी वाकड्यात गेल्यास सरळ कार्यक्रम करून टाका. आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय…’ असं नितेश राणे म्हणाले आहेत.
(हेही वाचा – Bihar Political Crisis : पाटण्यात बैठकांचे सत्र, नितीशकुमार आज राजीनामा देणार ?)
धर्मांतरबंदी, लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी व वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी नीतेश राणे (Nitesh Rane Controversial Statement) व महेश लांडगे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तहसील कार्यालयावर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाला संबोधित करताना नीतेश राणे यांनी हे विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे ?
‘आपण इतर धर्मीयांच्या सणांमध्ये अडथळे आणत नाही. पण आपल्या सणात मात्र इतरांचे अडथळे येऊ लागले आहेत. यापुढं कार्यक्रम करून टाकला हे सांगायला माळशिरसहून फोन आला पाहिजे. काय करायचं हे विचारायला फोन करू नका. कार्यक्रम झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवायची जबाबदारी आमची आहे. पोलिसांच्या समोर बोलतो. माझं काही वाकडं करू शकत नाही. आमचा बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काही होत नाही आम्हाला. आम्ही असेच बोलतो. आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय. कोणाच्या वाकड्यात जाण्यासाठी आलो नाही,’ असं नीतेश राणे (Nitesh Rane Controversial Statement) म्हणाले.
सागर बंगल्यावरील बॉस कोण ?
‘माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय’, असं नीतेश राणे म्हणाले. हा बॉस म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. ‘सागर’ बंगला हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईतील निवासस्थान आहे. त्यामुळं फडणवीस हे आपले बॉस आहेत आणि त्यांचा पूर्ण आशीर्वाद आपल्याला आहे असं (Nitesh Rane Controversial Statement) नीतेश राणे यांनी सुचवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community