रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला आयुक्तांची हजेरी; नितेश राणेंनी केले संतप्त सवाल

130

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याचा एक फोटो भाजपाचे आमदार नितेश राणेंनी शेअर करत संतप्त सवाल केले आहेत. हीच ती रझा अकादमी ज्यांनी हुतात्मा स्मारकाची मोडतोड केली. महिला पोलिसांवर हल्ले केले. भिवंडीत महिला पोलीस अधिका-यांना मारले. नांदेड, मालेगावसारख्या ठिकाणी दंगली भडकवल्या. कायम देशाविरोधात भूमिका घेणा-या रझा अकादमीच्या इफ्तारला मुंबईचे पोलीस कमिश्नर जातातच कसे? असा संतप्त सवाल राणेंनी केला आहे.

यामागे सरकारी अधिकार तर नाही ना? 

एका बाजूला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आम्हाला विधिमंडळात सांगतात की, रझा अकादमीवर आम्ही बंदी घालण्याचा विचार करत आहोत. दुसऱ्या बाजूला त्यांचेच अधिकारी रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहतात. महाविकास आघाडी सरकारने अधिकाऱ्यांना दिलेला हा सरकारी अधिकार तर नाही ना? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

( हेही वाचा: गणपत पाटील नगरला जो न्याय तोच न्याय अंधेरीतील जमिनीसाठी का नाही? भाजपचा सवाल )

हिंदूच्या बाजूने बोलणे हा गुन्हा आहे का?

या आधी नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला हिंदू विरोधी सरकार म्हणून संबोधले होते. तसेच, या राज्यात हिंदूंच्या बाजूने बोलणे गुन्हा आहे का? शक्ती कायदा कशासाठी आणला आहे. तीन महिने एखादी महिला सापडत नसेल, तर कायदा काय कामाचा? आम्ही कोणच्या धर्मा विरोधात नाही, मात्र हिंदू सण, मिरवणुका काढायच्या नाहीत का? बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असाताना, नगरमध्ये पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जातात असंही राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.