मुख्यमंत्र्यांना फसवले, ‘ते’ नगरसेवक जनआशीर्वाद यात्रेआधीच सेनेत!

ज्या नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, त्यांनी 22 जुलै रोजीच पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर देवगड नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र ज्या नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, त्यांनी 22 जुलै रोजीच पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. त्यामुळे हा प्रवेश नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेआधीच झाल्याचे म्हटले जात आहे.

मात्र आधी प्रवेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा प्रवेश का आणि तोही नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनंतर, असा सवाल आता राणे समर्थक उपस्थित करू लागले आहेत. देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या तिघांचा आधीच प्रवेश झाला होता.

(हेही वाचा : मंत्री आदित्य ठाकरेंनी जमवली गर्दी, गुन्हा दाखल करणार का? मनसेचा सवाल)

वैभव नाईक यांची ती पोस्ट व्हायरल!

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आपल्या फेसबुक पेजवर 22 जुलै रोजी देवगडमध्ये नारायण राणे, नितेश राणेंना धक्का, असे म्हणत त्या नगरसेविकांसह फोटो शेअर केला होता. मग आता पुन्हा पक्ष प्रवेशाचा घाट का?, असा सवाल मात्र यावेळी उपस्थित होत आहे.

नितेश राणे म्हणाले, ही तर येड्यांची जत्रा!

यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून…आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच..यालाच म्हणतात “येड्यांची जत्रा” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here