पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी! नितेश राणेंचा हल्लाबोल

भाजपचे नेते नितेश राणे यांनी मंगळवारी सकाळीच शिवसेनेवर पहिला वार केला. ट्विटरद्वारे राणे यांनी थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

नितेश राणे यांनी टि्वट करत आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी, असे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. तसेच बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा आहे, मात्र इथे सामान्य जनता महाविकास आघाडी सरकारने दिलेली सजा भोगत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. राणे यांनी आपल्या या ट्विटमध्ये एक व्यंगचित्र देखील शेअर केले आहे.

(हेही वाचा मिलींद तेलतुंबडेने चळवळीचा पैसा गाडला जमिनीत, नक्षलवाद्यांकडून शोधाशोध)

व्यंगचित्राद्वारे वार

या व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना राणे यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा असे म्हणत आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here