सुजित पाटकर, रवींद्र वायकर आणि सुरज चव्हाण हे केवळ मुखवटे आहेत. ही मंडळी कोणासाठी कंपन्या तयार करतात आणि गैरव्यवहार करतात, याचा शोध घ्यायला पाहिजे. मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुठल्या वाहिनी या रवींद्र वायकर यांच्या बिझनेस पार्टनर आहेत, असा हल्लाबोल भाजपचे नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला.
(हेही वाचा MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या सांभाव्य निकालावर काय म्हणाले शरद पवार-उद्धव ठाकरे ?)
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन शपथ घ्यावी
त्या वहिनींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत अजून किती शिवसैनिकांचा बळी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटूंब घेणार आहे. स्वतः भ्रष्टाचार करायचा, पैसे कमवायचे आणि मग ते परदेशात पाठवायचे. जेव्हा कारवाई होते, तेव्हा मात्र कधी रवींद्र वायकर, कधी सूरज चव्हाण अशी नावे समोर येतात. पण कधीतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ‘आम्ही पैसे घेतले आमच्या नावाने पैसे फिरले होते’, असे कबुल करावे, असेही राणे (Nitesh Rane) म्हणाले. खरे तर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीतील बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन शपथ घेऊन सांगावे की, रवींद्र वायकर, सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्या व्यवहारात उद्धव ठाकरे कुटुंबाचा कुठलाही हात नाही. हे सांगण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का?, असेही राणे (Nitesh Rane) म्हणाले.
Join Our WhatsApp Community