वांद्रे पूर्व येथील ४० वर्षांपासूनची ठाकरे गटाची शिवसेना शाखा २२ जून रोजी मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. ही शाखा अनधिकृत असल्यामुळे शाखेवर कारवाई करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला. याचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्च्यात शाखेचे पाडकाम केलेल्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व अनिल परब करत होते. या सर्व प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
सर्व अनधिकृत बांधकामांना उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद होता, ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच, अशा थेट शब्दात आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणीही राणेंनी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांवरुन ठाकरेंना सवाल करत नितेश राणे म्हणाले, “जे हिंदूंची बदनामी करतात, छत्रपतींची बदमानी करतात त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? या प्रश्नाचे उत्तर ठाकरेंना द्यावे लागेल. प्रकाश आंबेडकरांसोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही, जे त्यांच्यासोबत बसतात त्यांना विचारा की तुम्हाला शिवरायांचा अपमान चालतो का? संजय राऊत शुद्धीत आहे का? काल शाखा तोडली त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी आरडाओरड केली. पालिका अधिकाऱ्यांनी फोटो तोडण्याअगोदर काढण्याची परवानगी दिली होती.”
(हेही वाचा – थकबाकीदारांवर राज्य सरकार मेहरबान; क्रिकेट सामन्यांच्या बंदोबस्त शुल्कात ६० टक्क्यांची कपात)
“लोकांचा घरे तोडलीत तुम्हाला आठवण आहे का? की तुम्ही गजनी झालात? स्वत:च्या घराबद्दल विचार केला मग शाखांचा विचार का नाही केला, त्या नियमित का नाही केल्या? ज्या भागात मातोश्री आहे, त्याच विभागातील महिला भगिनींना पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतो हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्या सर्व अनधिकृत बांधकामांना उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद होता का? ज्यांनी ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच आहे.” असा हल्लाबोलही राणेंनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community