दिशा सालियन प्रकरणात SIT मधून चिमाजी आढाव पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याची नितेश राणेंची मागणी 

323

दिशा सालियन प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी SIT ची स्थापना केली. ज्यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणी गंभीर आरोप केले, त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला होता. आता नितेश राणे यांनी या SIT मधून पोलीस अधिकारी चिमाजी आढाव यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

नितेश राणे यांनी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे वरील मागणी केली आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही दिले आहे. याआधी थातूर मातूर तपास करून बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा संशयास्पद 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर सहा दिवसानंतर 14 जून 2020 ला सुशांत सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाला होता.सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसंबंधीच्या केसचा तपास मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवला आहे.

(हेही वाचा Ravindra Chavan : शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन)

काय म्हणाले नितेश राणे आपल्या पत्रात?

‘दिशा सालियन’ मृत्यू प्रकरणात मालवणी पोलीस ठाण्याच्या आरोपी अधिकाऱ्यांनी थातुर मातुर तापस करुन संगनमताने बनावट क्लोझर रिपोर्ट बनवून तत्कालीन ACP यांच्यामार्फत प्रकरण अपघात दाखवून बंद केले. त्यानंतर शासनाने ते प्रकरण पुन्हा पुन्हा उघडून पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केली. त्या एसआयटीमध्ये चुकून मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना सामील करून घेण्यात आले आहे. त्यांची निवड बेकायदेशीर आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.