अर्जुन खोतकरांमुळे दंगली! नितेश राणेंची पोलिसांत तक्रार

त्रिपुरातील कथित हिंसाचारानंतर राज्यात ठिकठिकाणी रझा अकादमीने दंगली घडवून आणल्या. अमरावती, मालेगाव येथे अतिशय भयानक हिंसाचार घडवून आणला गेला. या प्रकरणी भाजपाचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यांचा दंगलखोर रझा अकादमीला पाठिंबा होता, असे म्हटले होते. मंगळवारी या प्रकरणी खोतकर यांच्याविरोधात त्यांनी पोलिस ठाण्यार तक्रार दाखल केली.

काय म्हटले नितेश राणेंनी तक्रारीत?

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे हिंसाचार भडकेल अशी भाषणे केली, त्यामुळे जमाव प्रक्षुब्ध झाला. त्यानंतर जमावाने हिंदूंची दुकाने आणि घरे लुटली. ‘जिथे कुराण जाळले जाईल, जिथे मशीद तोडली जाईल, जेथे भगवत गीता जाळली जाईल, तिथे आपण सर्व जण या धरती मातेचे सुपूत्र बनून लढण्यासाठी उतरू’, असे प्रक्षुब्ध भाषण खोतकर यांनी केले. त्यामुळे जमाव भडकला आणि हिंसाचार झाला. खोतकर यांचा दंगलखोर रझा अकादमीला पाठिंबा आहे, असा आरोप राणे यांनी या तक्रारीत केला. या प्रकरणी त्यांनी जालना, नांदेड पोलिस ठाण्यात खोतकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांनी धार्मिक भावना भडकावल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here