Nitesh Rane यांचा संजय राऊतांवर पलटवार; म्हणाले, देवेंद्र फडणवीस…

154
Nitesh Rane यांचा संजय राऊतांवर पलटवार; म्हणाले, देवेंद्र फडणवीस...
Nitesh Rane यांचा संजय राऊतांवर पलटवार; म्हणाले, देवेंद्र फडणवीस...

उबाठा शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. ”शरद पवार (Sharad Pawar) यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे फडणविसांना १०० जन्म कळणार नाही.” असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. तर यावर प्रत्युत्तर देत, ”देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हा तुमचा सर्वांचा बाप आहे,” असा पलटवार नितेश राणे यांनी राऊत (Sanjay Raut) यांना लगावला आहे. त्यामुळे राऊत आणि राणे ही पुन्हा एकदा भिडलेले असल्याचे बघायला मिळत आहे. (Nitesh Rane)

संजय राऊत काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जहरी टीका केली. राऊत म्हणाले की, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी गुजरातला पळवले, राज्यातील अनेकसंस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजादेखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका असल्याचे राऊत यांनी म्हटले.

शरद पवार (Nitesh Rane) यांच्या डोक्यात काय चालले आहे, हे फडणवीस यांना कळाले असते तर त्यांची आजच्या सारखी अवस्था झाली नसती. शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. कोणाचे नाव आहे, कोणाचे नाही. 2019 साली सुद्धा पवार साहेबांच्या डोक्यात काय होते हे फडणवीसांना कळले नव्हते. पण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

(हेही वाचा – Ganpati Visarjan 2024: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नक्कीच नाही, असे वक्तव्य केले होते. यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? त्यांना हे कोणी सांगितलं? पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात आहे. पवारांच्या डोक्यात काय चाललंय ते जर त्यांना कळलं असतं तर त्यांची आज अशी अवस्था झाली नसती. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही, असे म्हटले होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.