अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी एक काॅकटेल चित्र शेअर करत, भाजपाचे आमदार नितेश राणे यांची खिल्ली उडवली होती. आता, नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंवरुन एक फोटो शेअर करत, ही प्रजाती फक्त भंगारात आढळते.. ओळखा पाहू कोण? असं कॅप्शन देऊन सोबत एक फोटो शेअर करत, नवाब मलिक यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
असं आहे ट्विट
नवाब मलिकांच्या ट्विटनंतर आता नितेश राणे यांनी मीम्सद्वारे मलिकांना उत्तर दिले आहे. नितेश यांनी डुकराचा फोटो ट्विट करत, मलिकांवर निशाणा साधला आहे. तसेच, हा फोटो ट्विट करताना नितेश राणे यांनी ही प्रजाती फक्त भंगारात आढळते ओळखा पाहू कोण असा खोचक सवालही केला आहे.
ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..
ओळखा पाहू कोण? pic.twitter.com/eoZzy7smAR— nitesh rane (@NiteshNRane) December 25, 2021
( हेही वाचा :शेतकर्यांकडून अल्पदरात जमिनी खरेदी करून नफा कमवणारे रॅकेट कार्यरत )
विधीमंडळाच्या पायरीवर काय घडले होते?
आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पाहून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा दिल्या. त्यांची घोषणा ऐकताच भाजप नेत्यांमध्ये एकच हशा पिकला. या म्याॅव म्याॅवच्या प्रकारानंतर वाद निर्माण झाला. अधिवेशनाच्या तिस-या दिवशी हा विषय विधीमंडळात चर्चेत आला. यावर एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन कोंबडा आणि मांजर यांचे काॅकटेल चित्र ट्विट करुन, राणेंची खिल्ली उडवली होती.
Join Our WhatsApp Community