भाजपा (BJP) नेते आणि कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे मत्स्य आणि बंदर खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर पदभार स्विकारल्यानंतर राणे यांनी सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे २६\११ नंतर आपण बरीच खबरदारी घेतली. पण समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचाही बंदोबस्त करणार आहे, असा इशारा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.
( हेही वाचा : Bullet Train संबंधी मोठी अपडेट; आता बाजूने गेली, तरी ट्रेनचा आवाज येणार नाही)
नितेश राणे यांनी खात्याचा पदभार स्विकारल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मत्स्य आणि बंदर खात्यातील विविध प्रश्नांवर भाष्य करत उपरोक्त इशारा दिला आहे. समुद्र किनारी रोहिंग्या (Rohingya people) आणि बांगलादेशी (Bangladeshi) यांचे वास्तव्य सहन करणार नाही, असेही (Nitesh Rane) ते म्हणाले.
मत्स्य आणि बंदरे दोन्ही खात्यांमध्ये काय सुरु आहे? आपण कुठून सुरुवात करायची? याचा मी आढावा घेतल्याचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले. माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना दिल्या, असेही राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले.
हेही पाहा :