
देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला (BJP) हिंदुत्व (Hindutva) शिकवायची संजय राऊत (Sanjay Raut) यांची लायकी नाही. ज्यांनी ३७० कलम हटवले, राम मंदिर उभारले, समान नागरिक कायद्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले, त्या पक्षाला तुम्ही काय हिंदुत्व शिकवणार? थोडीशी लाज असेल तर राऊतांनी औरंगझेब फॅन क्लबचे म्होरक्या आणि आपला मालक उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या दोन गोष्टी सांगाव्यात,अशी टीका नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राऊतांवर केली.
( हेही वाचा : Jharkhand मध्ये आदिवासी समाजाच्या उत्सवादरम्यान धर्मांध मुस्लिमांनी केला हल्ला)
पुढे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, भाजपाला “मिशा फुटल्या नव्हत्या” म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे लक्षात ठेवावे की तुम्ही “गोधडी ओली करत होतात” तेव्हा भाजपा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे श्रीराम मंदिरासाठी कारसेवा करत होते. आजचा उबाठा गट म्हणजे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणारी आणि वक्फ बोर्डाचं समर्थन करणारी हिरवीसेना झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटानं हिंदुत्वाचा “पीळ” सोडून दिला आहे, आणि आता काँग्रेसच्या अजेंड्यावर हिंदुत्वाशी लबाडी करत आहे. “राम आणि कृष्ण आले आणि गेले” असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले पण आजही हिंदू प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांवर श्रद्धा ठेवून आहेत. तुम्ही जनाबी परंपरा पाळायला सुरूवात केल्यामुळे राम आणि कृष्ण तुम्हाला कळणार नाहीत. महाराष्ट्रातील जनता सगळी सत्य परिस्थिती पाहत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) कितीही वटवट केली तरी लोकांना आता मूर्ख बनवता येणार नाही!, असा खरपूस समाचार राणे (Nitesh Rane) यांनी घेतला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community