माझ्या मतदारसंघातील जनतेच्या प्रेमातून मी तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. माझ्या मतदारसंघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणात मतदान केले. पण मला एकाही मुस्लिमानाने मतदान केले नाही, असे विधान भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.
( हेही वाचा : MLA Oath Ceremony : भाजपाच्या ‘या’ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ)
पुढे नितेश राणे म्हणाले की, आमच्यासारखे छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) मावळे हे २४ तास ३६५ दिवस जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. टीका करणारे कावळे हे केवळ निवडणुकीपूर्ते आहेत, असा ही टोला राणे यांनी लगावला. तसेच हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्यांवर मी निवडणुक लढवली आहे. मला मताधिक्यात मिळालेले ५८ हजार मतांमध्ये एकही मतदान मुस्लिम मतदाराने केले नाही. त्यामुळे माझा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी विचारांचा मतदारसंघ आहे, असे ही राणे (Nitesh Rane) म्हणाले.
दरम्यान संजय राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कळलेच नाहीत. त्यांना जिहादी अतिरेकी थरथर कापतात, याचा अनुभव येईल, असा हल्लाबोल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला. हा काँग्रेसच्या काळातील भारत नाही, तर नरेंद्र मोदींच्या काळातील हिंदुस्थान आहे. मोदींमुळे जगातला हिंदू (Hindu) समाज आज सुरक्षित आहे, असे ही राणे (Nitesh Rane) यांनी सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community