राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींपैकी आज मतमोजणी होत आहे. यातील काही निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीत सामील असणाऱ्या पक्षांनी आतापर्यंत सर्वाधिक ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
आतपर्यंत लागलेल्या निकालानुसार, भाजपनेच सगळ्यांत जास्त जागा भाजपने जिंकल्या आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने १५१ जागा जिंकल्या आहेत.
(हेही वाचा –Virat Kohli 49th Centuries : ‘मी काही गोट नाही,’ विराटची विक्रमी ४९व्या शतकानंतर प्रतिक्रिया )
सिंधुदुर्गात तळकोकणात भाजपचे आमदार
नितेश राणे (Nitesh Rane) यांची जादू कायम आहे. कणकवलीतील ओटव ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण राणे कुटुंबियांचं सिंधुदुर्ग भागात मोठं वर्चस्व आहे. कोकणसाठी अनेक विकासकामं राणे कुटुंबियांनी केली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही त्यांचाच दबदबा कायम राहिला आहे.
Join Our WhatsApp Community