
Nitesh Rane : राज्यात सध्या औरंगजेब कबरी (Aurangzeb’s Tomb) वरुण राजकारण तापले आहे. या संदर्भात विश्व हिंदू दल (Vishwa Hindu Dal) आणि बजरंग दल (Bajrang Dal) यांच्या मार्फत औरंगजेबची कबर काढण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. तर कबर हटाव मोहीम दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजपाच्या नेत्यांकडूनही कबर हटाव मोहिमेला पाठिंबा दिसून आला असून, ‘ज्याला औरंग्याची कबर हवी असेल त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशात घेऊन जावं.’ असं राणे म्हणाले आहेत. शिवनेरी किल्यावर शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने ते आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Nitesh Rane)
शिवनेरी किल्यावर (Shivneri Fort) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या तिथीप्रमाणे सोमवार, १७ मार्चला शिवजयंती कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी औरंगजेबाच्या कबरीबाबत राणेंना विचारले असता ते म्हणाले, आज हिंदू समाजाची भावना हीच आहे. की, महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. ज्या औरंग्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) हाल करून संपवलं. त्याची कबर आपल्याकडे कशाला पाहिजे. असा सवाल देखील उपस्थित केला.
(हेही वाचा – “लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती…” ; सभागृहात Ajit Pawar काय म्हणाले ?)
तसेच काही लोकांना ती मोठी आठवण वाटते. ती आम्हाला हिंदू समाज म्हणून नको आहे. कोणाला ती पाहिजे असेल तर पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं. तीच भावना मी आज व्यक्त केली आहे. आमचे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विचारांचे कार्यकर्ते पूर्ण समाज बोलतोय की, ती कबर महाराष्ट्रात नको. ती भावना आपल्याला कळायला हवी. म्हणून राज्यभर हे आंदोलन होत आहे. सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. असे विधान मंत्री नितेश राणे यांनी केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community