गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार यांच्याशी संवाद साधत चालू राजकीय घडामोडींवर भाष्य करत भाजप पक्षावर टीका करतात. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप पक्षाकडून नितेश राणे (Nitesh Rane) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून एकमेकांवर रोज आरोप – प्रत्यारोप होत आहेत.
अशातच राज्यात सध्या त्र्यंबकेश्वरमधील वादावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत SIT नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशावर संजय राऊत यांनी टीका करत एसआयटीची नेमणूक करण्यापेक्षा डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा अशा शब्दांत फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. त्या टीकेला प्रतित्यूर म्हणून भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
(हेही वाचा – Nitesh Rane : राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न – नितेश राणे यांचा आरोप)
संजय राऊत म्हणाले की, “मंदिरात कुणी घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं. काही जण मंदीराच्या परिससरात धूप दाखवून जात होते, ही त्यांची परंपरा आहे. त्यानुसार हे झालं आहे. या परंपरा सर्वत्र आहेत, असे राऊत म्हणाले.”
हेही पहा –
राऊत मुस्लिम लीगचे प्रवक्ते – नितेश राणे
बारा ज्योतिर्लिंगमध्ये त्र्यंबक एक महत्त्वाचं स्थान आहे. परंतु त्याठिकाणी धूप करण्यासाठी जमण्यात आल्याचं मुस्लिम लीगचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं. पण माझ्याकडे त्या मंदिराच्या ट्रस्टचं एक पत्र आहे. त्यानुसार मुस्लिम वर्गाने त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न वजा हट्ट केला, असं पत्रात म्हणण्यात आलं आहे. चादर घालण्याचा हट्टाहास करून ते लोकं तिथे आले होते. हे कदाचित मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याला समजलं नसेल. संजय राऊत हे मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहेत, असं म्हणत नितेश राणेंनी (Nitesh Rane) संजय राऊतांवर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community