‘आजही राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात…’ असं का म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे यांनी राणेंच्या नावाची जादू आपल्या ट्वीटद्वारे दाखवून दिली आहे.

152

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानानंतर लगेचंच दुस-या दिवशी युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. यावेळी सर्वात पुढे असणा-या मोहसीन शेख या युवा सैनिकाला आदित्य ठाकरे यांच्याकडून त्याच्या कामगिरीसाठी मोठे बक्षीस देण्यात आले आहे. मोहसीन शेख यांची युवा सेना सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरुन भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी हटके ट्वीट केले आहे. राणेंमुळे आजही शिवसेनेत पदं मिळतात असे म्हणत नितेश राणे यांनी राणेंच्या नावाची जादू आपल्या ट्वीटद्वारे दाखवून दिली आहे.

सिर्फ नाम ही काफी हैं…

कायमंच आपल्या आक्रमक ट्वीटने शिवसेनेवर हल्ला चढवणा-या नितेश राणे यांनी आपल्या हटके शैलीत पुन्हा एकदा शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मोहसीन शेख यांची युवा सेना सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी ट्वीट केले आहे. “राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती”. आज पण राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात, सिर्फ नाम ही काफी है, अशा शब्दांत त्यांनी ट्वीट केले आहे.

(हेही वाचाः योद्धा पुन्हा मैदानात…..!)

वाह मेरे शेख… 

युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वाखाली युवा सैनिकांनी राणेच्या घराबाहेर मोठा राडा केला. यावेळी मोहसीन शेख या कार्यकर्त्याला पोलिसांचा बेदम मार खावा लागला होता. त्याचेच फळ म्हणून आता मोहसीन शेख याची युवा सेना सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे बक्षिस शेख यांना देण्यात आले आहे. युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनीही ट्वीट करत शेख यांचे अभिनंदन केले आहे. युवासेनेचा ढाण्या वाघ मोहसीन शेख ह्यांची युवासेना सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

(हेही वाचाः हिंदुत्वासंबंधी भाजपासोबतचे नाते कायम राहणार! संजय राऊतांची भूमिका)

कोण आहे मोहसीन शेख?

  • युवा सेना सहसचिव पदी नियुक्ती झालेल्या मोहसीन शेख यांनी 2017 रोजी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला.
  • मोहसीन शेख यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या मानकूर शिवाजी नगर येथील नगरसेविका आहेत.
  • युवा सेनेच्या जनसंवाद यात्रेतही मोहसीन शेख सहभागी होते.
  • नारायण राणे समर्थक बरोबर झालेल्या राड्यात मोहसीन शेख अग्रेसर होते.
  • या राड्यात पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झाल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.