फक्त हिंदू समाजानेच सगळे सहन करायचे का? – आमदार नितेश राणे

155

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील हिंदू समाजाच्या तरुणाने मुस्लीम तरुणीशी लग्न केल्यानंतर, तो मुलगा बेपत्ता झालेला आहे. तरुणीच्या कुटुंबीयानीच संबंधित तरुणाचे अपहरण केल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात शनिवार, १० सप्टेंबर रोजी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तरुणाचे कुटुंबीय, माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कालपर्यंत लव्ह जिहादच्या प्रकरणात शेकडो मुलींना पळवले जाते, तेव्हा त्या हिंदू मुलींच्या आई-वडिलांची काय अवस्था होत असेल, तेव्हा मुस्लिम धर्मातील प्रौढांनी याचा विचार करावा, असे मत भाजपाचे आमदार नितेश राणे म्हणाले.

हिंदू मुलींना विकण्याचे, वैश्या व्यवसायास लावण्याचे काम केले जातेय

आमदार नितेश राणे म्हणाले, ‘संबंधित तरूणाने एक मुस्लीम मुलीशी लग्न केल्याने, त्या मुलीकडच्या लोकांना हे आवडले नाही. मग त्यानंतर त्यांनी रागापोटी द्वेषापोटी त्याचे अपहरण केले, आज त्याचे नेमक काय झाले, तो जिवंत आहे मेला आहे. याबाबत पोलीसही काही सांगत नाहीत आणि त्याच्या कुटुंबालाही काही माहीत नाही. आमच्या आक्रोश मोर्चात त्याचे वडील आमच्याबरोबर होते. प्रत्येक पाच मिनिटांनी त्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. मला एवढेच म्हणत होते की, माझा मुलगा फक्त माझ्यापर्यंत आणून द्या. त्याचे इतर कुटुंबीय देखील आम्हाला भेटले. ते देखील पोलिसांकडे उत्तर मागत आहेत. त्यांना विचारायचे माझ्या मुलाची नेमकी चूक काय आहे?, त्याने एका मुस्लीम मुलीशी लग्न केले ही त्याची चूक झाली का? मग दुसऱ्या बाजूला जेव्हा आमच्या हिंदू मुलींशी लग्न केले जाते किंवा विविध प्रकार त्यांच्यसोबत घडतात. मग त्यावर आम्ही अशाप्रकारे प्रतिक्रिया दिली तर चालेल का? आमच्या एका मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केले तर त्याचे अपहरण झाले आणि त्याचा पत्ता लागत नाही. मग असंख्य अशा घटना ज्या तुमच्या अहमदनगरमध्ये आणि महाराष्ट्रात घडतात. जिथे आमच्या हिंदू मुलींना विकण्याचे, वैश्या व्यवसायास लावण्याचे, त्यांना गायब करण्याचे आणि त्यांचे भविष्य अंधारात टाकण्याचे काम होते. मग तेव्हा हिंदू समाज म्हणून आम्ही नेमके काय करायचे? आम्ही असेच वागायचे का? सगळे सहन करण्याचा ठेका हा फक्त हिंदू समाजानेच घेतला आहे का?, असा सवाल यावेळी नितेश राणेंनी उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.