लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही नेते भाजपमध्ये जातील, असे रोहित पवार म्हणाले. तर फडणवीसांवरही त्यांनी टीका केली. त्यावर आता भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले. रोहित पवार नवीन ज्योतिषी आहेत, अशी टीका राणे यांनी केली.
दिल्लीतील भेट सदिच्छा भेट असू शकते. किंवा ठरल्याप्रमाणे भाजप काम करत नाही, यासह अनेक विषय असावेत. त्यामुळे १०० टक्के नाराजी आहे. फक्त नेत्यांमध्येच नाराजी नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे. मला आणि लोकांना असे वाटते की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिंदे-पवार गटातील काही नेते थेट भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली. रोहित पवारांच्या या विधानाचा संदर्भ देत नितेश राणेंनी (Nitesh Rane) त्यांना ज्योतिषी म्हटले. भाजपा आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे. आजकाल महाराष्ट्रात चेहरा वाचणारा नवीन ज्योतिषी आला आहे. ज्यांना अजित पवारांच्या चेहऱ्यावर काय लिहिले आहे, देवेंद्र फडणवीस कोणाच्या मागे आहेत, या सगळ्याच बाबतीत तो फार मोठा ज्योतिषी करतो, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या भाकितावर प्रत्युत्तर दिले.
(हेही वाचा INDI आघाडीत बिघाडी? तिसऱ्या आघाडीची तयारी…)
Join Our WhatsApp Community