भास्कर जाधव सोंगाड्या! नितेश राणेंचा घणाघात

भास्कर जाधव यांनी कोणीही शिवी घातली नाही. भास्कर जाधव हे तमाशातील सोंगड्या आहेत, आमच्यासारखे लोक त्यांना चांगले ओळखून आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. सभागृह तहकूब झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांमधील काही आमदारांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. त्यावर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी, भास्कर जाधव हे नरकासुर असून सोंगाड्या आहेत, अशा शब्दांत टीका केली.

भास्कर जाधवांना कुणीही शिवी दिली नाही!

१२ आमदारांचे निलंबन झाल्यापासून भाजप नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. आम्ही कोकणातले आहोत जाधवही कोकणातले आहेत. कोकणात दशावतार होतात, त्यात नरकासुर असतो. तो वेगवेगळे सोंग बदलतो. त्यात सोंगाड्याही असतो. जे जे भास्कर जाधव यांना ओळखतात, त्यांना माहीत आहे ते सोंगाड्या आहेत. ते नरकासुरासारखे आहेत. ते एकच सोंग कधीही ठेवत नाही. काल त्यांना कोणीही शिवी घातली नाही. कोणीही काहीही केले नाही. पण तमाशातील सोंगड्या कसा असतो, नरकासुर कसा असतो. तसे हे भास्कर जाधव आहेत. आमच्यासारखे लोक त्यांना चांगले ओळखून आहे. ते काय काय करतात ते आम्हाला माहीत आहे, असे सांगतानाच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान एका सोंगाड्या माणसाने केला आहे. त्यांना काहीही झाले नाही. मला आश्चर्य वाटते ते रडले का नाही? त्यांनी स्वत:चे कपडे का नाही फाडून घेतले. माझे बंधू निलेश राणे त्यांना चांगले ओळखतात, असे नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचा : आता ‘त्या’ १२ आमदारांचा वाद पोहचला राज्यपालांच्या दरबारी !)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here