Nitesh Rane: संजय राऊत राजकारणातला लावारीस आहे का?, नितेश राणेंचा सवाल

194
Nitesh Rane
Nitesh Rane: संजय राऊत राजकारणातला लावारीस आहे का?, नितेश राणेंचा सवाल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या रोज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणेंनी रोज सकाळी पत्रकार परिषद घेण्यास गुरुवारपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार शुक्रवारी देखील नितेश राणेंनी (Nitesh Rane) पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत राजकारणातला लावारीस आहे का? असा सवाल केला.

असे का म्हणाले नितेश राणे? (Nitesh Rane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रत्नागिरीतील बारसू रिफानयरीच्या मुद्द्यावर भाष्य करताना स्थानिकांना विश्वासात घ्या असे गुरुवारी म्हटले होते. शरद पवारांच्या या भूमिकावर शुक्रवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उलट सवाल केला. राऊत म्हणाले की, शरद पवार यांचे मी म्हणणे मी ऐकले. स्थानिक लोकांना विश्वासात घ्या त्यांच्याशी चर्चा करा…म्हणजे काय करायचे? याच पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आतापर्यंत महाराष्ट्राला जोरजोरात बोलणारे, संजय राऊत असे बोलायचे की मी पवारांचा माणूस आहे. पण आज पवार साहेबांच्या भूमिकेला विरोध करताना दिसले. ना तुम्ही उद्धव ठाकरेंचे राहिलात ना पवारासाहेबांचे राहिलात. मग नक्की हा आहे कोणाचा. राजकारणातला लावारीस आहे का?, असा खोचक सवाल नितेश राणेंनी यावेळी केला.

(हेही वाचा – Ajit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सल्ल्याचा अजित पवारांनी ‘असा’ काढला अर्थ)

नितेश राणेंचा राऊतांना इशारा (Nitesh Rane)

बारसूचे जे जमिनीदार आहेत, ज्यांनी ज्यांनी जमीन विकत घेतली आहे, त्यांच्या याद्या जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे, नक्की करा. कारण का काही याद्या आम्ही पण जाहीर करतो. मला आठवत काही महिन्यांअगोदर बारसूचा जेव्हा विषय सुरू झाला, तेव्हा माजी खासदार निलेश राणे यांनी काही नाव घेतली होती, ज्यांच्या बारसूमध्ये जमिनी आहेत. त्यात काही जमिनी ठाकरेंच्या नावाने कशा घेतल्या आहेत, त्यासंबंधित काही नावे जाहीर केली होती. आता एकाबाजूला संजय राऊत आणि विनायक राऊत यांना नाव जाहीर करायची असतील. आणि परत आपल्या मालकाला अडचणीत आणायचे असेल, तर त्यांनी जाहीर करावे. मग आम्ही पण बारसू किंवा त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या निगडीत असलेल्या जमिनी कशा आहेत, हे नावासकट आणि सातबारासकट आम्ही जाहीर करणार, असा इशारा नितेश राणेंनी दिला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.