‘उद्धव ठाकरेंचे धर्मांतर झालेय, राजकीय लव्ह जिहाद झालाय’; The Kerala Files संदर्भात बोलताना नितेश राणेंची ठाकरेंवर गंभीर टीका

209
भाजप आमदार, नितेश राणे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
'उद्धव ठाकरेंचे धर्मांतर झालेय, राजकीय लव्ह जिहाद झालाय'; The Kerala Files संदर्भात बोलताना नितेश राणेंची ठाकरेंवर गंभीर टीका

‘ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धर्मांतर झाले आहे. त्यांचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे. २०१९ला नुसते मुख्यमंत्री करू घेतले नाही, तर त्यांची सुंता केली आणि त्यांचा लव्ह जिहाद करून टाकला. म्हणूनच पाकिस्तानी आणि जिहादींची भाषा उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी करतायत,’ अशी गंभीर टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केली. सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Nitesh Rane VS Uddhav Thackeray)

दरम्यान सोमवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार यांची नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी संजय राऊत ‘दी केरळा फाईल्स’विषयी बोलताना म्हणाले की, जसा ‘द कश्मिर फाईल्स’ प्रोपगंडा चित्रपट होता, तशाच प्रकार ‘द केरळा फाईल्स’ प्रोपगंडा चित्रपट असल्याचे संजय राऊत म्हणाले. (Nitesh Rane VS Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊत यांचा व्हिडीओ शेअर करत ‘भाजप’वर हल्लाबोल)

नितेश राणे नक्की काय म्हणाले?

याच पार्श्वभूमीवर बोलत असताना नितेश राणे म्हणाले की, ‘यांना पाकिस्तानचा अजेंठा येथे चालवायचा आहे. शरिया कायदा लागू करायचा आहे. म्हणून यांना ‘द कश्मिर फाईल्स’ सारखे चित्रपट नको, म्हणून यांना ‘द केरळा स्टोअरी’ सारखे चित्रपट नको. या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतला माहित आहे का? काही वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या नेतृत्त्वात असलेल्या शिवसेनेने ‘माय नेम इज खान’चा विरोध केला होता. आठवत तुम्हाला. तेव्हा ‘माय नेम इज खान’चा विरोध करायचे, आणि आता तुम्हाला ‘द कश्मिर फाईल्स’ चालत नाही, ‘द केरळा स्टोअरी’ चालत नाही. मी वारंवार सांगतो, उद्धव ठाकरे आणि या सगळ्यांचे धर्मांतर झाले आहे. राजकीय लव्ह जिहाद झाला आहे, त्याचा परिणाम आहे तो. २०१९ला उद्धव नुसते मुख्यमंत्री करून घेतले नाही. सुंता केली आणि याचा लव्ह जिहाद करून टाकला. म्हणूनच पाकिस्तानी आणि जिहादींची भाषा हे उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी करतायत.’ (Nitesh Rane VS Uddhav Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.