शिवसेनेची ‘ती’ प्रकरणे आता नितेश राणे बाहेर काढणार?

नितेश राणे यांनी मला नोटिस पाठवली तर आम्ही शिवसेनेची सर्व प्रकरणे बाहेर काढू, असे सांगितले. त्यामुळे आता नितेश राणे नेमका काय हल्लाबोल करणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

सचिन वाझे यांच्यामुळे सध्या शिवसेना बॅकफूटवर असताना आता नितेश राणे यांनी देखील शिवसेनेविरोधात आपले दंड थोपटले आहेत. काल पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी वरुन सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत आरोप सिद्ध करुन दाखवा, नाहीतर मी क्रिमिनल अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता नितेश राणे यांनी मला नोटिस पाठवली तर आम्ही शिवसेनेची सर्व प्रकरणे बाहेर काढू, असे सांगितले. त्यामुळे आता नितेश राणे नेमका काय हल्लाबोल करणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

प्रकरणं बाहेर काढू का?

३९ वर्ष आम्ही बाळासाहेबांची सेवा केली. त्यामुळे शिवसेनेची सर्व अंडीपिल्ली आम्हाला माहीत आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर आम्ही देखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले. दरम्यान तपास यंत्रणांनी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधाचा तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. त्यामुळे आता वरुण सरदेसाई मला कोर्टाच्या नोटिसची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का? असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच असल्या धमक्यांना मी घाबरत नसल्याचे नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचाः वाझेंनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून मागितली खंडणी ! नितेश राणेंचा आरोप )

काय आहे नितेश राणेंचा आरोप

सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी युवा सेना सचिव वरुण सरदेसाईला सचिन वाझेंना फोन करण्याचा अधिकार कुणी दिला? आपल्या नातेवाईकाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री सचिन वाझेला पाठीशी घालत आहेत का? असा सवाल उपस्थित केला होता. यावेळी नितेश राणे यांनी फक्त आरोपच केला नाही. तर वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण तपासण्याची मागणी केली होती. वरुण सरदेसाई यांच्या कॉलचे सीडीआर एनआयएने तपासावे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांना दिलेल्या वाय प्लस सुरक्षेचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला होता.

वरुण सरदेसाईंनी काढला राणेंचा पूर्व इतिहास

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच ते सभागृहात मांडले आहेत, असे म्हणत गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरित्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजिबात गांभीर्याने घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, अशी टीका वरुण सरदेसाई यांनी केली होती. नितेश राणे यांनी जे आरोप केले आहेत ते सिद्ध करावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला तयार रहावे, असे देखील सरदेसाई म्हणाले.

(हेही वाचाः ‘ती’ गाडी चोरी झालीच नव्हती… वाझेंच्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज काय दाखवत आहे?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here