नितेश राणे यांचे महापालिका प्रशासकांना पत्र: मागील भ्रष्टाचारी सत्ताधारी सेनेच्या कार्यपध्दतीचा अवलंब नको!

140

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने विचारात न घेतलेल्या १२३ प्रलंबित प्रस्तावांबाबत अद्यापही प्रशासकांनी निर्णय न घेण्यात विलंब केला जात असल्याने भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रशासक इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी प्रशासकांच्या निवडक प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली आहे. प्रलंबीत १२३ प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल, तर आपण संपूर्णपणे त्याला नामंजूर करावे. पंरतु कुठल्याही परिस्थितीत निवडक प्रस्तावांना मान्यता देऊन मागील सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नका,असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

भाजपाच्या टीकेनंतर प्रस्ताव संमत

letter 2

मुंबई महापालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे महापालिका बरखास्त झाली आहे. महापालिका संपुष्टात आल्याने यापूर्वीच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आलेले परंतु समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे कामकाज पहाणारे विमल अगरवाल यांची कंत्राटदारांशी बोलणी फिस्कटल्याने काही प्रस्ताव विचारात घेतलेले नाहीत, असे एकूण १२३ प्रस्ताव होते. हे प्रस्ताव मंजूर करणे हे आता प्रशासकाच्या अखत्यारित आहेत. परंतु आपण यावर ठोस निर्णय घेताना दिसला नाहीत, असे सांगत भाजपने नालेसफाईच्या कामांबाबत तीव्र टीका केल्यानंतर आपण २५ दिवसांनी नालेसफाई आणि चर बुजवण्याच्या कामांचे प्रस्ताव समंत केले, याची आठवण करून दिली.

( हेही वाचा: IT कडून धडक कारवाई! यशवंत जाधवांच्या 41 मालमत्ता जप्त )

तुमची प्रतिमा मलीन होते 

त्यानंतर बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी आठ प्रस्तावांना मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. परंतु आपण स्वत: आयुक्त आहात आणि प्रशासकही आपणच आहात. स्थायी समितीने बोलणी फिसकटलेले प्रस्ताव आपण निवडक पद्धतीने मंजूर करत आहात. त्यामुळे  मागे सत्तेत असणाऱ्या भ्रष्टाचारी  सेनेचा आपल्यावर दबाव तर नाही ना अशी आमची धारणा होत आहे आणि तरीही काही निवडक प्रस्तावांनाच आपण मान्यता देण्याच्या आपल्या कार्यपद्धतीमुळे आपली प्रतिमासुद्धा मलीन होत आहे. आपल्याला प्रलंबीत १२३ प्रस्तावांमध्ये अवैधता आढळत असेल, तर आपण संपूर्णपणे त्याला नामंजूर करावे. पंरतु कुठल्या परिस्थितीत निवडक प्रस्तावांना मान्यता देऊन मागील सत्ताधारी सेनेच्या भ्रष्टाचाराला साजेल अशी पुरक कार्यपद्धती अवलंबू नये, असे नितेश राणे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.