‘राज्यात पुन्हा युती शक्य, पण…’ काय म्हणाले शिवसेनेचे अब्दुल सत्तार?

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारने २ वर्षे पूर्ण केली, मात्र आता सरकारमधील घटक पक्षांमध्ये वादविवाद सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत सेना-भाजप युतीविषयी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्वाचे वक्तव्य केले. मात्र त्यासाठी सत्तार यांनी भाजपाच्या एका नेत्याच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अब्दुल सत्तार हे दिल्ली गेले होते, तेथे त्यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या.

काय म्हटले अब्दुल सत्तार? 

गडकरी राज्यात आले, तर शिवसेना-भाजपचे मने जुळतील का? असा प्रश्न मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला होता. त्यावर नितीन गडकरी ज्यादिवशी मने जुळविण्याचा निर्णय घेतील, त्यादिवशी खरोखर मने जुळतील, असे सत्तार यांनी म्हटले. शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते. मी शिवसेनेचा साधा कार्यकर्ता आहे, पण भविष्यात युतीचा प्रस्ताव गेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच विचार विनिमय होऊ शकतो, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रात भविष्यात कुठलेही परिवर्तन करायचे असल्याच, त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी, असेही ते म्हणाले.  दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडून भाजपसोबत यावे, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यापूर्वी म्हटले होते.

(हेही वाचा ‘रश्मी ठाकरे मुख्यमंत्री व्हाव्यात’ म्हणणारे अब्दुल सत्तार पहिले नाहीत…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here