गुढीपाडव्यानिमीत्त दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथे झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात भाजपावर टीका केली नाही. त्यामुळे या भाषणानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतिर्थावर त्यांना भेटायला गेल्याने युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर आता नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या भेटीचे कारण सांगितले आहे.
राजकारणाशी कुठलाही संबंध नाही
या भेटीबाबत नितीन गडकरी म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. तसेच त्यांनी नवीन घर पहायला मला बोलवले होते. म्हणून मी त्यांना भेटायला आलो. या भेटीचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट होती. त्यांचे माझे संबंध गेल्या तीस वर्षांपासून आहेत. त्यामुळे आजच्या भेटीचा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी दिली आहे.
( हेही वाचा: शौचालय, पाण्याची सुविधा नाही मुंबई पालिकेसमोर एसटी कर्मचा-यांचे बोंबाबोंब आंदोलन! )
काय म्हणाले प्रवीण दरेकर ?
अशा भेटी फक्त वैयक्तिक नसतात. त्यात राजकारणाच्या चर्चा होतच असतात. त्यामुळे भविष्यात भाजप आणि मनसेची सकारात्मक चर्चा होऊ शकते. कारण राज ठाकरेंनी शिवतीर्थावर हिंदुत्वाची घेतलेली भूमिका ही आमच्याशी जुळणारी भूमिका आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community