गडकरी म्हणाले, आम्हाला विदर्भाची लाज वाटते!

84

पुणे, कोल्ह्यापुर येथे जेवढे दूध दररोज संकलित होते, हे खरेच कौतुकास्पद आहे. दुग्ध व्यवसायात पश्चिम महाराष्ट्र हा अति हुशार वर्गातील आहे, तर विदर्भ हा काटावर पास होणारा आहे. आम्ही विदर्भात इतके दूध संकलित करत नाही, याची विदर्भवासीयांना लाज वाटेत की नाही, हे माहित नाही पण मला आणि मंत्री सुनील केदारे आम्हा दोघांना मात्र याची लाज वाटते, असे मत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज ३ हजार २८ कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर १ हजार ४६ कोटीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते.

आपल्याकडील गीर जातीची गाय १९५२ साली ब्राझीलमध्ये गेली होती. त्या जातीचा सांड त्याला टोरँडो म्हणतात. त्याचे सिमेन आता आपण भारतात आणले. आपल्याकडे ज्या देशी जाती आहेत. त्यात आपण जर चांगल्या प्रकारचे सिमेन वापरले. दोन लीटरच्या गाईला जर आपण हे सिमेन वापरले तर त्यातून कमीत कमी २५ लीटरची कालवड तयार होते. महाराष्ट्रात मी सुनील केदार यांना विनंती केली होती आणि त्यांनी योजनाही काढली आहे. १०० रुपयामध्ये त्यांनी सबसिडी दिली आहे आणि आता हे सिमेन उपलब्ध करुन दिले आहे, असेही गडकरी म्हणाले.

(हेही वाचा : आता सुरत ते हैद्राबाद महामार्ग : महाराष्ट्राचीही होणार चांदी!)

गायीचे गर्भाशय प्रत्यारोपण! 

आपल्या गायीचे जे पोट किंवा गर्भ आहे त्याचे प्रत्यारोपण करता येईल. भारत सरकारच्या मदतीने मी आपल्या नागपुरात व्हेटर्नरी विद्यापीठ आहे, तिथे एक मोठी प्रयोगशाळा निर्माण केली आहे. तिथे आम्ही गाईचे पूर्ण लिव्हर प्रत्यारोपण करायचे. ते केल्यानंतर त्या गाईला चांगल्या सांडाचे सिमेन दिले तर २५ – ३० लीटर दूध देणारी कालवड तयार होते. जसे बेटी बचाओ अभियान आहे. तसे आता तंत्रज्ञान बदलले आहे. त्यामुळे ९९.९९ टक्के कालवडच होते, गोऱ्हा होत नाही. पश्चिम महाराष्ट्रात चितळेंनी आता हे सुरु केले आहे. महाराष्ट्र सरकारनेही पुढाकार घेतला, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.