मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून धीम्या गतीनं सुरुच आहे, ते कधी पूर्ण होणार असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.महाराष्ट्राच्या दृष्टीनं नाजूक प्रश्न असा आहे की, २०१४ पासून २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्ग का झाला नाही. तर हा महामार्ग रखडयाला मीच जबाबदार आहे. (Nitin Gadkari)
तर महामार्ग रखडण्याची कबुली देताना या कामात किती अडचणी आल्या याची माहिती त्यांनी दिली. एका माध्यम समूहाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली.
महामार्ग रखडला याला मीच जबाबदार
यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, “पहिली गोष्ट तर महामार्ग झाला नाही तर त्याला मीच जबाबदार आहे. याची जबाबदारी मी दुसऱ्यावर ढकलंत नाही. कोकणतील नदीवरील पूल वाहून गेला, त्यानंतर तो आम्ही आठ-नऊ महिन्यात पूर्ण केला. खरं म्हणजे हा महामार्ग जर आधीच पूर्ण झाला असता तर हे लोकही मृत्यू पावले नसते.
(हेही वाचा : RAJ THAKREY : शहरं सुंदर दिसण्यासाठी मुळात सौंदर्यदृष्टी सत्तेत असायला पाहिजे, राज ठाकरेंची टीका)
पहिल्यांदा हा महामार्ग हा महाराष्ट्र सरकारकडं दिला होता. त्यावेळी छगन भुजबळ मंत्री असताना त्यांनी टेंडर काढून याची कामं दिली. त्यातले कॉन्ट्रॅक्टर बदलले, पुरेशा अडचणी आल्या. जागा अधिग्रहणाला अजूनही अडचणी येत आहेत. पण ज्या काही अडचणी आणि समस्या आल्या असतील त्याला मी कोणालाही जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी माझ्या आयुष्यात सर्वाधिक बैठका घेतल्या. जवळपास ७५ ते ८० बैठका झाल्या असतील तरीही मला यश मिळालं नाही. पण याचं वर्षी डिसेंबर महिन्याच्या आत हा मुंबई-गोवा रस्ता पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community