पुणे कचरामुक्त व प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्रीय दळवणळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अनेक उपाय सांगितले. पुण्यात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पुणे अजून वाढवू नका,पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी चांदणी चौक पुलाचे लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले
यावेळी पुढे बोलताना सांगितले की ,मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला येत होतो. त्यावेळी मला आठवते पर्वतीवरुन गार हवा येत होती. परंतु आता ही हवा हरवली आहे. पुणे सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे. यामुळे आता पुणे अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. पुणे शहरातील हवा, पाणी आणि आवाजाच्या प्रदूषणापासून मुक्त करायचे आहे. पुण्याला पेट्रोल, डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. त्यासाठी इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. पुणे शहरात स्काय बसचा प्रकल्प राबता येईल, असे नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी सांगितले.
मेट्रोला उशीर अभ्यासू लोकांमुळेच झाला
पुणे शहरात मेट्रोला उशीर अभ्यासू लोकांमुळेच झाला. पण आता इतर प्रकल्पांच्या योजनांना लवकर मंजुरी द्या, असे नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी पुणेकरांना टोला लगावला.
कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा.
पुणे शहरात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्याची योजना आहे. परंतु कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प करु नका, त्याऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी केला तर पुण्यात कचरा उरणार नाही. आम्ही आमचे टॉयलेटचे पाणी विकून ३०० कोटी रुपये कमावतो, असे गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.
(हेही वाचा :‘BDD’ Chawls : ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकासात घोटाळा; बनावट कागदपत्रे तयार करून घरे विकली)
मंत्र्यांच्या ताफ्यात असणारे सायरन बंद करणार
मंत्र्यांच्या ताफ्यात असणाऱ्या वाहनांचे सायरन काढणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केलीये. लवकरच कर्णकर्कश हाॅर्न ऐवजी मधूर आणि सुरेल भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवण्यात येणार आहे.
चांदणी चौकाचे नाव ‘दोन दादां’नी मिळून ठरवा, मी मान्यता देईल
नितीन गडकरी म्हणाले, पुण्याला बडल इंजिन लागले. दोन दादा एकत्र आले आहेत. आमचे डिपार्टमेंट वेळेत भ्रष्टाचारमुक्त आणि काम पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते.म्हणून मी ठेकेदारांना देखील तंबी देतो. चांदणी चौकाचे नाव जे काही आहे ते अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांनी मिळून ठरवावे, मी त्याला मान्यता देईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community