Nitin Gadkari: भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

आपल्याला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधादेखील विकसित कराव्या लागतील आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

225
Nitin Gadkari: भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा
Nitin Gadkari: भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

देशातील रस्ते आणि महामार्ग सुधारण्यावर भारत सरकार दिवसेंदिवस काम करत आहे. त्यामुळे भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी याविषयी माहिती दिली.

भारतातील रस्त्यांबाबत ते म्हणाले की, लवकरच भारताचे रस्ते अमेरिकेसारखे होतील. देशाला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात रस्त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘या वर्षाच्या अखेरीस भारताचे जाळे अमेरिकेसारखेच चमकदार होईल केंद्र सरकार देशभरात ३६ एक्सप्रेस हायवे बांधत आहे. ज्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. दिल्ली ते चेन्नईला जोडणाऱ्या महामार्ग प्रकल्पाच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर ३२० किमीने कमी होईल, असंही गडकरी म्हणाले.’

(हेही वाचा –Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाला पाठिंबा; काय म्हणाले छगन भुजबळ? )

आसाममधील नुमालीगडमध्ये बांबूपासून इथेनॉल तयार केले जात आहे. इंधनातील बदलामुळे आणि चांगल्या रस्त्यांच्या विकासामुळे, देशातील लॉजिस्टिक खर्च एक अंकी कमी होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य

असे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, भांडवली गुंतवणूक आणि उद्योगाचा विकास हवा असेल, तर चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात, ही गोष्ट स्पष्ट हवी. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण याशिवाय आपण शेती, सेवा आणि उद्योगाचा विकास करू शकत नाही. पायाभूत सुविधांशिवाय पर्यटनाचा विकास होऊ शकत नाही. २०१४ मध्ये मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. जेव्हा आपण एक महान देश विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा आपल्याला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधादेखील विकसित कराव्या लागतील आणि त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. ईशान्येकडील आसाम राज्यात बांबूपासून इथेनॉल तयार केले जात आहे, असंही या कार्यक्रमादरम्यान गडकरी म्हणाले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.