मुंबईतील वाहतूककोंडी ही मोठी समस्या आहे. यावर भाष्य करताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की,मी जर राज्यमंत्री असतो तर मुंबईतील वाहतूकीची समस्या सोडवण्यासाठी तीन मजली उड्डाणपूल उभारले असते.
आणखी उशीर झाला असता
मी मुंबईत अनेक दिवसांनी आलो. माहिमच्या उड्डाणपूलावरून येताना ट्रॅफिग जॅम मध्ये फसलो, त्यामध्ये 20-25 मिनीटे गेली. 1995 ला राज्यात सत्ता असताना मी मंत्री होतो, त्यावेळी मी अनेक उड्डाण पूल बांधली. ते जर आज नसते तर या कार्यक्रमात पोहोचायला आणखी एक तास उशीर झाला असता, असं वाहतूक कोंडीवर बोलताना, नितीन गडकरी म्हणाले.
तीन मजली पुलाची आवश्यकता
मुंबईत सातत्याने वाढणा-या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे, गडकरी म्हणाले. त्यामुळे तीन मजली उड्डाणपूल बांधणं आवश्यक असल्याचं, गडकरी म्हणाले. पहिल्या तीन मजल्यावर रस्ते आणि त्यावर मेट्रो असा पूल बांधण्याची गरज असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.
( हेही वाचा :महागाईची लाट! पेट्रोल-डिझेलच्या दरात आठवड्याभरात पाचव्यांदा वाढ )
कधीही भेदभाव केला नाही
भाजपाच्या उत्तर प्रदेशातील कामावरही नितीन गडकरी यांनी यावेळी भाष्य केलं. देशातील हिंदुत्वाला चुकीच्या पद्धतीने मांडलं जात असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आमच्या सरकारने जाती, धर्म आणि भाषेच्या नावावर कधीही भेदभाव केला नाही, असही गडकरी म्हणाले.
Join Our WhatsApp Community