“माझी कामं पटली, तर लोक मतं देतील नाहीतर देणार नाहीत…मी आता लोणी लावणार नाही”; गडकरींनी स्पष्टच सांगितलं

126

विकासाच्या कामांना खीळ घालणाऱ्या प्रवृत्ती आणि अवास्तव दबावगट निर्माण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शाब्दीक चपराक लगावली आहे. तुम्हाला पटले तर मतदान करा किंवा करू नका परंतु, मी आता कुणाला फार लोणी लावू शकत नाही अशा शब्दात गडकरींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

( हेही वाचा : दोन विमानांची होणार होती धडक, तेवढ्यात…जाणून घ्या संपूर्ण घटना)

पद्मविभूषण रघुनाथ माशेलकरांच्या हस्ते रविवारी गडकरींना मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. पिनाक दंदे, अनंत घारड आणि गिरीश गांधी प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजकारणाला जास्त वेळ द्यायचा आहे – गडकरी 

नागपुरात आयोजित या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, आजवर भरपूर कामे केली आहेत. ती लोकांना पटली असेल तर लोक मतं देतील, नाहीतर देणार नाहीत. मी काही लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही समाजकारणाला जास्त वेळ द्यायचा आहे असे गडकरींनी जाहीरपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपले हित लोकांना कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोकांना पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्व समजत नाही अशी खंत गडकरींनी व्यक्त केली. मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या विषयांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वेस्ट लँडवर बांबू लागवड केली तर 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहु शकते. त्यातून पर्यावरण रक्षणासोबत रोजगार निर्मितीही होऊ शकते असे गडकरी यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.