गडकरींनी साखर उद्योगाला दिला नवा पर्याय, म्हणाले…

82

आता साखर तयार करणे तोट्याचा उद्योग बनला आहे. तरी देखील साखर कारखाने जिवंत राहिले, तर शेतकरी जिवंत राहणार आहे. त्यामुळे कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करू नये, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात मागील वर्षभरात ३० लाख टन अधिक साखर उत्पादन झाले. आता साखर कुणी विकत घेत नाही, हीच स्थिती गहू, तांदूळ, मका उत्पादनाची आहे. त्यामुळे आपल्याला आहे ते साखर कारखाने आणि ऊस ऊत्पादक शेतकरी यांना समाधानी करायचे असेल तर साखर कारखान्यांना इथोनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि नवीन साखर कारखाने उभे करण्यावर बंदी घातली पाहिजे, असेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री म्हणाले.

अहमदनगर येथील कार्यक्रमात गडकरी बोलत होते, त्यावेळी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते. इथोनॉलचे उत्पादन वाढले तर महाराष्ट्राचे अर्थकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात इथोनॉलचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे. सध्या आपल्याला मोठ्या प्रमाणात इथोनॉलची गरज आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जेवढे इथोनॉल निर्माण होईल ते सर्व केंद्र सरकार घ्यायला तयार आहे. कारण हे इंधन पेट्रोलपेक्षा चांगले आहे आणि ते पर्यावरणपूरक आहे.

(हेही वाचा : आता सुरत ते हैद्राबाद महामार्ग : महाराष्ट्राचीही होणार चांदी!)

ब्राझीलमध्ये विमाने इथोनॉलवर चालतात! 

ब्राझील येथे ८५ टक्के पेट्रोलच्या गाड्या ह्या इथोनॉलवर चालवल्या जातात. १०० टक्के इथोनॉलमध्ये वाहने चालवल्या जाव्यात, अशी अपेक्षा आहे. राहुल बजाज आणि टीव्हीएस स्कुटीने इथोनॉलवर चालवणाऱ्या गाड्या बनवल्या आहेत. ६२ रुपये लिटर इथोनॉल मिळते. त्यामुळे साखर कारखान्यांनी आधी इथोनॉल निर्मितीची परवानगी घ्यावी. आपण आधीच  सगळ्या कंपन्यांना सांगितले आहे, त्यात टाटा, महिंद्रा, मर्सिडीज यांचाही समावेश आहे. त्यांना त्यांच्या गाड्यांची निर्मिती करतानाच इंजिन असे बसवावे की ते इथोनॉलवरही चालेल, हे त्यांच्यासाठी सक्तीचं केली आहे. त्याऊपरही त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्याची आमची तयारी आहे, असे सांगत सध्या ब्राझीलमध्ये विमानेही इथोनॉलवर चालतात, भारतातील एकूण इंधन व्यवसायातील १२ लाख कोटींपैकी ५ लाख कोटी जरी महारष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घरात गेले तर कोण कशाला उपाशी राहील, असेही गडकरी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.