आज राजकारणाचा स्तर असायला पाहिजे, तसा राहिलेला नाही. आपल्याला राजकारणाची व्याख्या रिडिफाईन केली पाहिजे. सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही. राष्ट्रकारण, विकासकारण हे खर राजकारण आहे. त्यामुळे मी ठरवले आहे, वागताना गुणात्मक पद्धतीने वागले पाहिजे. कमरेखालचे वार मी करत नाही. वाजपेयी मला म्हणाले होते की, सभागृह बंद पाडूनच आपल्या भावना मांडता येतात असे नाही. योग्य भाषेत देखील आपल्याला भावना व्यक्त करता येऊ शकतात. आम्ही त्याकाळी फार आक्रमक होतो. आज लोकशाही त्याच स्तंभावर उभी आहे, अशी भावना भाजपा (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केली. ते एका मुलाखतीत बोलत होते.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : संध्याकाळी 7 वाजेपर्यत निर्णय सांगा, अन्यथा आमचं ठरलंय; प्रकाश आंबेडकरांना मविआचा इशारा)
सामूहिक विचारातून निर्णय होतात
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलली आहे. शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष फुटले. या राजकारणाविषयी नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नितीन गडकरी या वेळी म्हणाले, “मी व्यक्ती म्हणून नाही, तर मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. व्यक्तिगत भूमिकेतून निर्णय होत नाहीत. सामूहिक विचारातून निर्णय होतात. त्या निर्णयाशी मी सहमत आहे. आजही मी बाळासाहेबांबद्दल चांगलच बोलतो. युती बदलली पार्टी बदलली म्हणून आपले मत बदलले, असे कधीही होत नाही. शरद पवारांशी मतभेद आहेत. त्यांचे आणि आमचे विचार वेगळे आहेत. काही विचारांबाबत सहमती देखील आहे. व्यक्तीगत संबंध चांगले असतात. ते जोपासले पाहिजेत, हेच वाजपेयी यांनी सांगितले होते.”
पत्रकारांनी संभ्रम निर्माण करू नये
या मुलाखतीत गडकरी यांनी माध्यमांनाही बातम्यांचा विपर्यास न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “राजकारणाच्या मर्यादा वेगळ्या आहेत. आघाडी मोडली म्हणजे मैत्री तुटली, असे होत नाही. मात्र याचा विपर्यास करणे आणि संभ्रम निर्माण करणे हा कदाचित मनोरंजनासाठी किंवा टीआरपीसाठी उपयोगी ठरेल. म्हणून काही जण करत असतील. मी मनोहर जोशींना भेटायचो. राज ठाकरेंना भेटत असतो. उद्धव ठाकरेंशी कधी कधी भेट होते. शिवाय अनेक वर्षे मी शिवसेनेबरोबर काम केले होते. पत्रकारांनी संभ्रम निर्माण करु नये. जे घडले ते दाखवावे. विश्वसनीयता जपावी. उलट तिलट लिहून सनसनाटी निर्माण करणे क्रेडिबिलीटीसाठी योग्य नाही.” (Nitin Gadkari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community