महामार्गावरील खड्ड्याची थेट गडकरींना तक्रार! दोन तासांत काय झाले? वाचा…

टोल आकारत असलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे असतात. तेथून वाहन चालकांना कसरत करत पुढे जावे लागते.

110

सध्या भारतात रस्ते विकासाचा वेग चांगलाच वाढला आहे, नवीन रस्ते, महामार्ग निर्माण करण्याच्या कामाला गती आली आहे, परंतु आधीपासून असलेल्या रस्त्यांची स्थिती काही ठिकाणी दयनीय झालेली पाहायला मिळते. त्याला भले काही ठिकाणी स्थानिक प्रशासन, राज्य सरकार जबाबदार असेल, परंतु काही ठिकाणी केंद्र सरकार कारणीभूत आहे. अशाच महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या आणि कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाची तक्रार थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींना करण्यात आली. त्यानंतर दोनच तासात त्याचा परिणाम दिसला.

दोन तासांत खड्डा बुजवला

मध्य प्रदेशमध्ये एका राष्ट्रीय महामार्गावर खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाला. त्यानंतर कार मालकाने थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे  तक्रार केली. यानंतर दोन तासांत तो खड्डा बुजविण्यात आला आणि कंपनीवर कारवाई देखील झाली.  टोल आकारत असलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे असतात. तेथून वाहन चालकांना कसरत करत पुढे जावे लागते. मध्य प्रदेशच्या एनएच-47 वर एका वकिलाच्या कारला अपघात झाला. त्याने गडकरींकडे याची तक्रार केली. गडकरींच्या आदेशावरून NHAI ने ओरिएंटल स्ट्रक्टर इंजिनिअरिंग कंपनीवर गुन्हा दाखल केला असून तेथील खड्डे दोन तासांत बुजविण्यात आले आहेत.

(हेही वाचा : नाव बहिणींचे, मालमत्ता अजित पवारांची! किरीट सोमय्यांचा हल्लाबोल)

नागपूरच्या व्यक्तीने तक्रार केली 

बैतूलच्या आमलामध्ये राहणारे वकील राजेन्द्र उपाध्याय हे त्यांच्या आईवर उपचार करण्यासाठी नागपूरहून घरी परतत होते. तेव्हा हिवरा गावाच्या जवळ रस्ता खराब असल्याने त्यांची कार उलटली. यामध्ये ते आणि त्यांची आई दोघेही जखमी झाली. उपाध्याय यांनी याची तक्रार चिचौली पोलिस ठाण्यात केली होती. एनएच-47 च्या देखरेखीचे काम ओरिएंटल कंपनी करत आहे. या कंपनीने रस्त्यावर खड्डे खोदले होते. परंतू वाहन चालकांना सावध करण्यासाठी कोणताही बोर्ड किंवा सूचना लावली नव्हती. यामुळे त्याच दिवशी आणखी दोन कारचा तिथे अपघात झाला होता. यामुळे एनएएचएआयने कंपनीला आरोपी बनवत गुन्हा दाखल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.