Nitish Kumar : सर्व पक्ष भाजप विरोधात लढण्यास तयार : नितीश कुमार

185
Nitish Kumar यांची प्रकृती बिघडली, पाटणातील मेंदाता रुग्णालयात दाखल
Nitish Kumar यांची प्रकृती बिघडली, पाटणातील मेंदाता रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष तयार असून ही वज्रमूठ कायम असेल, असा विश्वास नितीश कुमार यांनी बैठकी नंतर बोलताना व्यक्त केला. पाटण्यात शुक्रवारी विरोधी पक्षांची पहली बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत १५ पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना यूपीए चे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली. विरोधी पक्षांची दुसरी बैठक शिमलामध्ये होणार आहे. ही बैठक १० ते १२ जुलैदरम्यान होऊ शकते.

सर्व पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नितीश कुमार म्हणाले की, विरोधी पक्षांची दुसरी बैठक शिमलामध्ये होणार आहे. ही बैठक १० ते १२ जुलैला आहे. लवकरच सर्व पक्षांची पुढची बैठकही आयोजित केली जाईल. या बैठकीत कोण, कुठे लढणार याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या पायावरच हल्ला होत आहे. भाजप आणि संघ मिळून आक्रमण करत आहेत. मी बैठकीत म्हटले की, आपण सर्व सोबत उभे आहोत. सर्व पक्षांमध्ये काही प्रमाणात आपसांत वैचारिक मतभेद आहेत. पण आपण एकत्र काम करू. जी चर्चा झाली आहे, ती पुढच्या बैठकीत आणखी पुढे नेऊ.

(हेही वाचा – महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार?; बावनकुळेंचा मविआला टोला)

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नितीश कुमार यांनी चांगल्या प्रकारे बैठकीचे आयोजन केले आहे. पाटणामधूनच आंदोलन सुरू होते. दिल्लीमध्ये अनेकदा बैठक झाली. पण त्याचा काहीही निष्कर्ष निघाला नाही. आजच्या बैठकीत तीन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे आपण एक आहोत. दुसरी आपण एकत्र लढू आणि तिसरी म्हणजे भाजप जो पॉलिटिकल अजेंडा आणेल, त्याला आपण विरोध करू. आज इतिहासातील मोठा दिवस आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी कलम ३७० हटवण्याच्या आम आदमी पार्टीच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्व पक्षांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना पाठिंबा द्यावा असे काँग्रेसला सांगितले आहे. बैठकीत ममता बनर्जींनी सर्वांनाच वैयक्तिक महत्वाकांक्षा सोडाव्या लागतील असे म्हटले आहे. कोणीही दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्न करू नये असे ममतांनी म्हटले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.