Nitish Kumar CM Oath : नितीश कुमार यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; भाजप आणि जेडीयूचे नवे सरकार स्थापन

Nitish Kumar CM Oath : रविवार, 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडीसोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला. आता भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी नवे सरकार बिहारमध्ये (Bihar) स्थापन केले आहे.

285
Nitish Kumar CM Oath : नितीश कुमार यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; भाजप आणि जेडीयूचे नवे सरकार स्थापन
Nitish Kumar CM Oath : नितीश कुमार यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; भाजप आणि जेडीयूचे नवे सरकार स्थापन

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोठ्या सत्तानाट्यानंतर अखेर भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. (Nitish Kumar CM Oath)

रविवार, 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडीसोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला. आता भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी नवे सरकार बिहारमध्ये (Bihar) स्थापन केले आहे. नितीश कुमार यांच्यासह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

(हेही वाचा – Google Map : नेटवर्क गेल्यावरही रस्ता दाखवेल गूगल मॅप; जाणून घ्या कस वापरायचं हे ॲप…)

म्हणून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला…

नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रीमंडळात भाजपचे काही नेतेदेखील सहभागी होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नितीश कुमार यांचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे.

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्यांनी या वेळी म्हटले की, महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच कामे राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडि आघाडीमधून बाहेर पडणार आहोत.

(हेही वाचा – Puntin on PM Modi : पुतीन यांच्याकडून नरेंद्र मोदींचे कौतुक ;म्हणाले आजच्या जगात हे सोपे नाही)

कोणत्या पक्षाची कशी स्थिती ?

बिहार विधानसभा 243 सदस्यांची आहे. विधानसभेचे 243 आमदार आहेत. विधानसभेच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालूंचा आरजेडी हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. आरजेडीला (RJD) 79 जागा मिळाल्या. दुसऱ्या स्थानावर 78 आमदारांसह भाजप (BJP) आहे. तिसऱ्या स्थानावर सध्याच्या महायुतीतील जेडीयू अर्थात नितीश कुमार यांच्या पक्षाचे 45 आमदार आहेत. या युतीत काँग्रेसही आहे, ज्यांच्याकडे 19 आमदार आहेत.

नितीश यांचा पक्ष संख्याबळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाला असला, तरी त्याच पक्षाने राजकीय गणिते बदलली आहेत. (Nitish Kumar CM Oath)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.