बिहारमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. बिहारचे (Nitish Kumar) मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज म्हणजेच रविवारी २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमध्ये सत्तापालट होणार आहे. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने आपला पाठिंबा दर्शवला आहे.
(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : ओबीसींवर अन्याय होणार नाही; सगळ्या समाजाला न्याय मिळणार)
त्यामुळे भाजपसोबत मिळून जेडीयू सरकार स्थापन करेल, हे आता स्पष्ट झालं आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबतच आणखी तीन मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या घोषणेनंतर एनडीएच्या आमदारांची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास नितीश कुमार हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
(हेही वाचा – Narendra Modi: प्रभू रामाचे राज्य संविधान निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान म्हणाले…)
या सर्व राजकीय घडामोडीनंतर नितीश कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे –
राजीनामा दिल्यानंतर राजभवनाबाहेर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी नितीश कुमार म्हणाले, “मी नुकताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करण्यास सांगितलं आहे.”
तुमच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली ?
त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली ? त्यावर उत्तर देतांना त्यांनी सांगितलं की, ” हा राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा घेरलं, प्रश्न विचारले मात्र मी तेव्हा याविषयी बोलणं टाळलं. मी सर्वकाही पाहत होतो. मला अनेकांनी वेगवेगळे सल्लेही दिले. मात्र मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतरच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.”
#WATCH | Patna | Bihar outgoing CM and JD(U) president Nitish Kumar says, “Today, I have resigned as the Chief Minister and I have also told the Governor to dissolve the government in the state. This situation came because not everything was alright…I was getting views from… pic.twitter.com/wOVGFJSKKH
— ANI (@ANI) January 28, 2024
(हेही वाचा – Raj Thackeray: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा – राज ठाकरे)
जे. पी. नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार –
अशातच आज संध्याकाळपर्यंत बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन होऊ शकते. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासोबतच भाजपशासित दोन उपमुख्यमंत्रीही शपथ घेतली. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community