Ashok Chaudhary यांच्या पोस्टमुळे नितीश कुमार अस्वस्थ; पक्षांतर्गत नाराजी उघड

58
Ashok Chaudhary यांच्या पोस्टमुळे नितीश कुमार अस्वस्थ; पक्षांतर्गत नाराजी उघड
  • प्रतिनिधी 

बिहारच्या राजकारणात संयुक्त जनता दलाचे अर्थात जेडीयूचे मंत्री अशोक चौधरी (Ashok Chaudhary) सध्या चर्चेत आहेत. पक्षात अशोक चौधरी असंतुष्ट असल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी त्यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजीच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. अशोक चौधरी यांच्या या पोस्टनंतर त्यांना सीएम हाऊसमध्ये बोलावण्यात आले. अशोक चौधरी घाईघाईत मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. दीड तास ते तिथेच थांबले मात्र नेमके काय बोलणे झाले त्याचा तपशील समजला नाही.

दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींवर अशोक चौधरी (Ashok Chaudhary) म्हणाले की, प्रत्येकाची स्वतःची विचारसरणी असते. काहींना तोच ग्लास अर्था भरलेला दिसतो तर काहींना तो अर्धा रिकामा दिसतो.

(हेही वाचा – Kangana Ranaut ला भाजपाने चांगलेच खडसावले; वादग्रस्त विधानापासून अंतर ठेवण्याची तंबी)

चौधरींची पोस्ट काय?

अशोक चौधरी (Ashok Chaudhary) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, वय झाले असेल तर त्यांना सोडा. एक-दोनदा समजावूनही कोणाला समजत नसेल तर ते समोरच्याला समजावून सांगणे सोडा. मुले मोठी झाल्यावर जेव्हा ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागतात, तेव्हा त्यांच्या पाठिमागे लागणे सोडा. मोजक्याच लोकांशी तुमचे विचार जुळत असतात. एक-दोघांशी जर ते जुळत नसतील तर त्यांना सोडा. ठराविक वयानंतर तुम्हाला कोणी विचारले नाही किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर ते मनावर घेणे सोडून द्या. तुमच्या हातात काहीच नाही हे लक्षात आल्यावर भविष्याची चिंता करणे सोडून द्या.

इच्छा आणि क्षमता यात खूप फरक असेल तर स्वतःकडून अपेक्षा करणे सोडून द्या. प्रत्येकाची स्थिती, उंची, वस्तू, सर्वकाही वेगळे आहे, म्हणून तुलना सोडा. जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसतसे जीवनाचा आनंद घ्या, तुमच्या दैनंदिन खर्चाची चिंता करणे थांबवा. शांतपणे जगायचे असेल तर अपेक्षा सोडा. ही कविता त्यांनी टाकली होती. तथापि, ती कोणाला उद्देशून होती याचा त्यातून उलगडा झाला नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत त्यांनी याची माहिती त्यांना दिली असावी. दरम्यान, अशोक चौधरी (Ashok Chaudhary) म्हणाले की, ते नितीश कुमार यांना आपले मानस पिता मानतात. राजकारणात ज्या व्यक्तीने मला सर्वांत जास्त आदर दिला ते म्हणजे नितीश कुमार, मी नितीश कुमार आणि जेडीयूसाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.