Maharashtra BJP नेतृत्वात कोणताही बदल नाही; दिल्लीतील बैठकीत निर्णय

Maharashtra BJP : लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजपाला जे अपयश आले. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वात बदल होईल, अशी चर्चा होती; पण दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

155
BJP Core Committee Meeting : महायुतीत समन्वयाचा अभाव नको, केंद्रीय नेत्यांच्या सूचना

महाराष्ट्र भाजपाच्या (Maharashtra BJP) महत्त्वाच्या नेत्यांशी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा (JP Nadda) व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात चर्चा केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठक मंगळवार, १८ जून रोजी पार पडली. यात मित्रपक्षांनी एकमताने लोकसभा अध्यक्षपदाचा निर्णय पंतप्रधान मोदींवर सोडण्याचा निर्णयही घेतला.

(हेही वाचा – BMC मुख्यालय आणि मुंबईतील 50 रुग्णालये बॉम्बने उडवण्याची धमकी)

नेतृत्वात कोणताही बदल नाही

या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणूक हरण्याच्या कारणांवर चर्चा

यंदा लोकसभा निवडणुकांत भाजपने महाराष्ट्रात ९ जागा जिंकल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात २२ जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणूक हरण्याच्या कारणांवरही यावेळी चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा, मुस्लीम आणि मागासवर्गीय भाजपच्या विरोधात एकत्र येऊन मतदान करत असल्याचा मुद्दा चर्चिला गेला.

बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करणारे घटक आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उणिवा कशा दूर करता येतील, अशा सर्व मुद्द्यांवरही चर्चा झाली. आता भाजप महायुतीत समाविष्ट असलेल्या आपल्या मित्रपक्षांशीही चर्चा करणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी रोड मॅप

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोड मॅप दिला आहे. विधानसभा निवडणुकीत (Maharashtra BJP) जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी व मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप मोठे निर्णय घेणार आहे. १८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिरला यांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे, असे सांगितले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.