योगी सरकारचा मोठा निर्णय! इतिहासाच्या पुस्तकातून वगळले मुघलांचे धडे

119

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आगे. उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSE बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारने बदलला आहे. त्यामुळे आता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही.

( हेही वाचा : IPL 2023 : विराट कोहलीचा नवा विक्रम! मुंबई इंडियन्सचा RCB कडून पराभव)

मुघलांचे धडे वगळले 

उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे आता अकरावीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतीमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती अशा प्रकारचे सर्व धडे काढून टाकण्यात आले आहेत. आगामी २०२३-२०२४ पासून हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. इतिहासाच्या पुस्तकाबरोबर इतर विषयांमध्येही बदल करण्यात आला आहे. नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचे वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे वगळण्यात आले आहेत.

…म्हणून वगळला मुघलांचा इतिहास, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितले

नव्या पिढीला आपला वारसा काय आहे हे शिकवणे गरजेचे आहे. आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे मुघलांचा इतिहास वगळून आपल्या संस्कृतीविषयक शिकवला जाणार आहे. असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.