- प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (Marxist Communist Party) राज्यभरात पक्षाचे व जनसंघटनांचे मजबूत काम असलेल्या आणि प्रदीर्घ व यशस्वी लढे केलेल्या केवळ १२ जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे. इतर डाव्या व पुरोगामी पक्षांनीही आपला प्रभाव असलेल्या मर्यादित जागांची मागणी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (Marxist Communist Party) शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती, आणि आपण लढणार असणाऱ्या १२ जागांची यादी या सर्व नेत्यांना तेव्हाच लिखित स्वरूपात सादर केली होती.
(हेही वाचा – Chief Justice Of Bombay High Court : सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण?)
महाविकास आघाडीने या १२ जागा माकपला सोडाव्यात व त्यानंतरच उर्वरित जागांच्या बाबत आपसात वाटाघाटी कराव्यात अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (Marxist Communist Party) केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष मात्र माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत. इतर डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party) या पार्श्वभूमीवर जाहीर मागणी करत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांना महाविकास आघाडीने तातडीने सामावून घ्यावे. निवडणूक लढण्याबद्दल त्यांचे आग्रह अत्यंत प्रामाणिकपणाने विचारात घेतले जाऊन सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्यांची असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community