Jagdish Dhankar यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

37
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेमध्ये काँग्रेसने सभापती जगदीप धनखड (Jagdish Dhankar) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी दिलेली नोटिस फेटाळून लावण्यात आली आहे.

घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचा कट 

राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेल्यास त्यावर सभागृहात चर्चा होते. मात्र आता नोटिसच फेटाळून लावली गेल्याने आता सभागृहात चर्चा होणार नाही. राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी यांच्या वतीने सभागृहात सादर करण्यात आलेल्या आपल्या निर्णयात राज्यसभेच्या उपसभापतींनी सांगितले की, महाभियोगाची नोटिस ही देशाच्या घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचा आणि विद्यमान उपराष्ट्रपतींची बदनामी करण्याचा कटाचा भाग होती. दरम्यान, १० डिसेंबर रोजी विरोधी पक्षांमधील ६० सदस्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdish Dhankar) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठीच्या नोटिसीवर स्वाक्षरी केली होती. तसेच राज्यसभा सभापती म्हणून जगदीप धनखड (Jagdish Dhankar) यांची वर्तणुक ही पक्षपाती असून, आमचा त्यांच्यावर विश्वास नसल्याचा दावा विरोधी पक्षांमधील सदस्यांनी केला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.