बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना केंद्रातील भाजपा सरकार बांगलादेशच्या क्रिकेट संघासमोर पायघड्या घालत आहे. स्वतःला हिंदुत्ववादी मानणाऱ्या भाजपाचे हिंदुत्व निवडणुकीपुरते आहे का, असे हल्लाबोल करत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या बांगलादेशात क्रिकेट मालिका नको, अशी मागणी शिवसेनेचे (उबाठा) आमदार प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मातोश्री येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून हिंदूवर अत्याचार सुरु असल्याच्या बातम्या काही माध्यमे व सोशल मीडियावर आहे. यात तथ्य असेल तर बांगलादेशच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकारवर कोणाचा दबाव आहे?, असा सवाल उपस्थित करत पराराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत स्पष्टता जाणून घेण्यास उत्सुक आहे. तसेच भाजपाचे हिंदुत्व गेले कुठे? हे हिंदुत्व निवडणुकीसाठी असते का, असा टोलाही ठाकरे (Aditya Thackeray) यांनी लगावला.
वन नेशन वन इलेक्शन, राज्यात इलेक्शन नाही
वन नेशन वन इलेक्शन’ या कायद्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. हरियाणा जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर केल्या, त्यावेळी महाराष्ट्र झारखंडच्या निवडणुका जाहीर का केल्या नाहीत. मुंबई महापालिकेसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन वर्षांपासून घेतलेल्या नाहीत. मात्र वन नेशन वन इलेक्शनची भाषा करणाऱ्या भाजपा सरकारला महाराष्ट्र, झारखंडमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नाही, असा घणाघात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपावर केला.
Join Our WhatsApp Community