सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अद्याप निर्णय नाही – शंभूराज देसाई

97
राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

अभ्यासांती निर्णय घेऊ

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतचा प्रस्ताव राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनतेसमोर ठेवला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी  चर्चा  करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल. मात्र काही माध्यमांनी याबाबत विपर्यास करून  वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केटमधील वाईन धोरणांच्या बाजूने, असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासांती निर्णय घेईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.