पाकिस्तानच्या समोर संकटाची मालिका कमी व्हायला तयार नाही. काल-परवाच जाफर ट्रेन विद्रोहींनी हायजॅक केल्याची घटना घडली नाही तोच आता अमेरिका (America) पाकिस्तानला मोठा धक्का देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत पाकिस्तानींना प्रवेश बंदी करण्याची तयारी केली आहे.
(हेही वाचा Malhar Certificate : झटका मटणासाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’च्या घोषणेला जेजुरी देवस्थानाचा पाठिंबा)
अमेरिका (America) पाकिस्तानला प्रवास बंदी यादीत ऑरेंज कॅटेगिरीत ठेवणार आहे. अफगाणिस्तान, इराक, इराण आणि लेबनानसारख्या देशांवर प्रवास निर्बंध लावण्याची शक्यता आहे. लीबिया, फिलिस्तान, सोमालिया, सूडान, सीरिया आणि यमन यांचाही निर्बंध लावलेल्या देशांच्या यादीत समावेश होण्याचा धोका आहे. पाकिस्तानी नागरिकांना अमेरिकेत (America) प्रवास करण्यावर पूर्ण निर्बंधाचा सामना करावा लागणार नाही परंतु त्यांना अमेरिकन व्हिसा देताना कठोर तपासणीतून जावं लागेल. पाकिस्तानी नागरिकांसाठी विशिष्ट प्रकारचा व्हिसा तयार केला जाऊ शकतो ज्यात केवळ बिझनेसबाबत प्रवासाला परवानगी मिळेल. अमेरिकेत येणारे लोक राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करू नये यासाठी अमेरिकन ट्रम्प सरकार पाऊल उचलत असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community