अजित पवारांना घेतल्याने नुकसान नाही; Chandrasekhar Bawankule यांचे सूचक विधान, म्हणाले…

193
]अजित पवारांना घेतल्याने नुकसान नाही; Chandrasekhar Bawankule यांचे सूचक विधान, म्हणाले…
]अजित पवारांना घेतल्याने नुकसान नाही; Chandrasekhar Bawankule यांचे सूचक विधान, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने महायुतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांचाही समावेश करुन घेतला होता. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही भाजपा नेत्यांनी निवडणुकीत केला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये (Rss Organizer Magazine) भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. या लेखातूनही भाजपा नेत्यांचे कान टोचण्यात आले. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, अजित पवार यांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.  (Chandrasekhar Bawankule)

(हेही वाचा – Drug trafficking: अबब… खबऱ्याचा कॉल आला अन् ४९४ किलो गांजा झाला जप्त)

४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला केवळ २४० जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजपा नेत्यांचा अतिआत्मविश्वास असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आली आहे. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा (Ratan Sharada) यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपाला झटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली, असा सवालही रतन शारदा यांनी लेखातून विचारला आहे. त्याच संदर्भाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळे आमची मतं वाढल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. (Chandrasekhar Bawankule)

(हेही वाचा – झोपण्यापूर्वी रोज वेलची खा, ‘हे’ असंख्य फायदे मिळवा)

अजित पवारांना घेऊन भाजपाचं कोणतही नुकसान झालेलं नाही. याउलट २०१९ च्या तुलनेत भाजपाची मतं वाढली आहेत, असे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मात्र, २०१९ च्या तुलनेत जागा कमी झाल्या हे सत्य आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतील उमेदवार निवडणूक हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. मात्र, जिंकलेल्या असतील तिथे ईव्हीएमवर संशय का घेत नाहीत, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला. (Chandrasekhar Bawankule) 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.