आंतरराष्ट्रीय अवाॅर्ड (Global Teacher Award) मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचे काम होऊ नये, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज ग्लोबल टीचर्स अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डिसले गुरुजींच्या चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डिसले गुरुजी आज मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी डिसले यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय अवाॅर्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचे काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चुकीचे काम होऊ नये याबाबत सर्व आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.
( हेही वाचा: WiFi चा वापर करण्यात मध्य रेल्वेचे हे स्थानक आघाडीवर! CSMT स्थानकालाही टाकले मागे )
Join Our WhatsApp Community