-
प्रतिनिधी
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अडीच वर्षांपासून सातत्याने काम करत आहोत. त्यामुळे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर लोक प्रवेश करत आहेत. आता कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी ‘एकनाथ पर्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमात केले.
ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “एक सामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांना हे पचले नाही. ते टीका करत असले तरी मी जनतेच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध राहीन.”
(हेही वाचा – अभिनेते Sharad Ponkshe यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान)
आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, आणि लोककल्याणाच्या योजनांवर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळात नागरिकांसाठी जीवाची पर्वा न करता कार्य केले. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे पाच कोटी नागरिकांना थेट लाभ मिळाला. “लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीच्या काळात राज्य विकासाच्या बाबतीत मागे पडले होते. मात्र, अडीच वर्षांत ही कमतरता भरून काढली आणि पुढील दहा वर्षांची पायाभरणी केली, असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी सांगितले. शिवसेनेत विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू असून, पक्ष अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आता कितीही अडथळे आले तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही,” असे ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community